Update Aadhar Card : तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुनं असेल तर आधार अपडेट करून घ्या. - Kisan Wani

Friday, July 28, 2023

Update Aadhar Card : तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुनं असेल तर आधार अपडेट करून घ्या.

Update-Aadhar-Card
Update Aadhar Card

Update Aadhar Card : आधार कार्डच्या होणाऱ्या फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने नागरिकांना त्यांचे आधार अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे. तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल किंवा ते कधीच अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब आधार कार्ड अपडेट (Update Aadhar Card) करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे.


    या संदर्भातील सर्व सूचना 'आधार कार्ड 'च्या वेबसाईटवर देण्यात आल्या आहे. आधार अपडेट केल्यानंतर ते वापण्यास सुलभता येईल आणि त्यामुळे कोणतीही फसवणूक होणार नाही, आशय या सूचनेत देण्यात आलं आहे. तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या गावातील आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करू शकता किंवा ऑनलाईन देखील अपडेट करता येते. आधार कार्डवरील कोणती माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने दुरुस्त करता येते या बद्दलची माहिती जाणून घेऊया..


बायोमेट्रिक तपशील अपडेट (Aadhaar Biometric Update)

  1. जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी आधार कार्ड तयार केला असे, तर जेव्हा मुल 5 वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हा तुम्हाला पुन्हा आधार कार्ड अपडेट करावा लागेल. तुम्हाला मुलाचा बायोमेट्रिक डेटा द्यावा लागेल. यानंतर मुलाचा नवीन आधार तयार होईल. मात्र, आधार क्रमांक तोच राहणार.
  2. आधार नोंदणीच्या वेळी 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी- रहिवासी 15 वर्षांचे झाल्यावर सर्व बायोमेट्रिक माहिती अपडेटकरणं आवश्यक आहे.
  3. 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधार कार्डधारकांनी त्यांचा बायोमेट्रिक डेटा दर 10 वर्षांनी अपडेट करावा.
  4. बायोमेट्रिक डेटामधील काही चुकांमुळे तुमचे आधार पडताळणी अयशस्वी झाल्यास, तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक माहिती पुन्हा प्रविष्ट करावे लागतील.

डेमोग्राफिक तपशील अपडेट 

  1. लग्नानंतर लग्नामुळे नाव आणि पत्त्यात बदल होऊ शकतो. नवीन ठिकाणी गेल्यामुळे पत्ता आणि मोबाईल नंबर देखील बदलू शकतो. 
  2. नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकांमुळे आधार अपडेट करणे, ज्यामुळे तुमची "जन्मतारीख / वय" आणि "लिंग" चुकीची असल्यास अपडेट करणे आवश्यक असू शकते.

आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी (Aadhaar Address Update)

  1. आधार कार्ड वरील पत्त्ता बदलण्यासाठी तुम्हाला ssup.uidai.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल..
  2. आधारचे पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये Update your Aadhaar वर पर्यावर क्लिक करा.
  3. Update Your Aadhaar कॉलममध्ये आधार अपडेट करण्यासाठी तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील, जसे की आधार केंद्रावर जाऊन अपडेट करणे, ऑनलाइन अपडेट करणे.
  4. त्या पैकी ऑनलाइन अपडेट (Online Update) वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  5. येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकावा लागेल.
  6. आधार नंबर टाकल्यानंतर पडताळणी करावी लागेल. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल फोन नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी इथे कुना तुम्ही पेजवर लॉग इन कराल.
  7. आता नवीन पत्ता अपडेट करण्यासाठी पात्याचा परवा डॉक्युमेंटचा फोटो अपलोड करा.
  8. फोटो अपलोड केल्यानंतर सबमिट करा. फोटो सबमिट केल्यानंतर, तुमच्यासमोर एक विनंती क्रमांक येईल, जो तुम्ही नोंद घ्या.
  9. अशा प्रकारे तुमचा पत्ता तुमच्या आधार क्रमांकामध्ये अपडेट केला जाईल.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी (Aadhar Mobile No Update)

    आधारला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी किंवा नवीन नंबर जोडण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला तुमचा नंबर लिंक किंवा अपडेट करावा लागेल. यासाठी 50 रुपये शुल्क द्यावी लागेल.

बायोमेट्रिक अपडेटसाठी  (Update Aadhar Card)

    आधारची सर्व माहिती अपडेट करण्याची सुविधा आहे. त्यासाठी आवश्यक नियम आणि शुल्क आहे.  जर तुम्हाला बायोमेट्रिक अपडेट (Biometric Update) करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावे लागेल. 

    बायोमेट्रिक अपडेटसाठी (Biometric Update) 100 रुपये शुल्क लागते, तर इतर डेमोग्राफिक (Demographic Update) अपडेटसाठी शुल्क 50 रुपये लागते. जर बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक दोन्ही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते. सर्व शुल्कांवर GST स्वतंत्रपणे लागू आहे.

नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी कागदपत्रांची यादी

ओळखीसाठी कोणते डॉक्युमेंट्स
  • पॅन कार्ड.
  • रेशन कार्ड.
  • मतदान कार्ड.

पत्ता बदलण्यासाठी कागदपत्रे
  • पासबुक.
  • रेशन कार्ड.
  • वोटर आईडी.
  • विजेचं बिल.
  • पाण्याचं बिल.

जन्मतारीख बदलण्यासाठी कागदपत्रे
  • जन्म प्रमाणपत्र.
  • पॅन कार्ड.
  • तुमचे मार्कशीट्स.
  • SSLC बुक / सर्टिफिकेट.

आधार अपडेट करण्यासाठी ऑफलाइन पद्धत

    तुमचा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व कागदपत्रां घेऊन आधार केंद्राला भेट देऊ शकता. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?