Crop Insurance 2022 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू - Kisan Wani

Sunday, April 2, 2023

Crop Insurance 2022 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू

Crop-Insurance
Crop Insurance
Crop Insurance 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही दरवर्षी खरीप पीकविमा भरला असेल, तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम बँक खात्यात (Pik Vima) जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नक्की कोणत्या शेतकऱ्यांना पिकविम्याचं लाभ मिळणार. याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

खरीप पीक विमा 2022

    शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. जर निसर्गाने साथ नाही दिली, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी, याअनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. 

    2022 मध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा (Kharip Pik Vima) भरलेला होता. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी, पुर व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले. शेतकऱ्यांना आतुरता होती, ती पीक विमा नुकसान भरपाईची.

Crop Insurance 2022 

अर्थसंकल्पात विमा वाटपाची घोषणा

    सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विरोधकांनी पीक विम्याचा प्रश्न मांडल, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रतिउत्तर म्हणून सांगितले की, शेतकऱ्यांची पिक विम्याची (Crop Insurance) रक्कम येत्या 31 मार्च 2023 पूर्वी वाटप करण्यात येईल.

    मुख्यमंत्र्याकडून घोषणा केल्यानंतर जवळपास 244 कोटी 86 लाख 25,869 रु. इतकं निधी शेतकऱ्यांना पीकविमा पोटी वाटप करण्याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला.

पीक विमा जिल्हा यादी 

    HDFC ERGO इन्शुरन्स कंपनीमार्फत पिक विमा वाटप  खालील जिल्यानं सुरु. तर खरीप पिक विमा 2022 ची नुकसान भरपाई रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.
  • संभाजीनगर
  • भंडारा
  • अकोला
  • पुणे
  • धुळे
  • रायगड
  • हिंगोली

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?