PM Kisan : पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची पात्र - अपात्र लाभार्थी यादी पहा. - Kisan Wani

Friday, January 20, 2023

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची पात्र - अपात्र लाभार्थी यादी पहा.

PM-Kisan-13th-Installment-List

PM Kisan : केंद्र शासनाची शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्वाची योजना असलेली पंतप्रधान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत शेतकर्‍यांना 2 हजार रुपयांचे 12 हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. आता 13 वा हप्ता (13th Installment) लवकरच वितरीत करण्यात येणार आहे.


    त्याआधी पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची पात्र - अपात्र लाभार्थी यादी तुमच्या मोबाईल मध्ये कशाप्रकारे पाहू शकतात. या बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या ह्या लेखात जाणून घेऊयात.


PM Kisan 13th Installment List

अशी पहा पात्र लाभार्थ्यांची यादी

    पीएम किसान योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहावी ? हे जाणून घेऊ.
  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट जा. हि आहे – https://pmkisan.gov.in/
  • वेबसाइट ओपन झाल्यानंतर Farmers Cornez मधील BENIFICIARY LIST या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता तुम्हाला ज्या गावामधील पात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल ते गाव निवडा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून Get Report या बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची पात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.

PM Kisan

अशी पहा अपात्र लाभार्थ्यांची यादी

        पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहावी ? हे जाणून घेऊ.
  • सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट जा. हि आहे – https://pmkisan.gov.in/
  • वेबसाइट ओपन झाल्यानंतर PAYMENT SUCCESS मधील Dashboard या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला ज्या गावातील अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ते गाव निवडा.
  • त्यासाठी सर्वप्रथम तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून पुढील Submit या बटणावर क्लिक करा.
  • त्या गावचा संपूर्ण Dashboard दिसेल. त्यापैकी Aadhaar Authentication Status या बटणावर क्लिक करा.
  • त्या गावामधील Total Ineligible या टेबल मध्ये पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.
  • ज्यांचे नाव या यादीत असतील त्यांना 13 वा हप्ता मिळणार नाही.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?