Kharip Pik Vima : खरीप 2022 पीक विम्यासाठी 724 कोटींचा निधी मंजुर. - Kisan Wani

Saturday, January 14, 2023

Kharip Pik Vima : खरीप 2022 पीक विम्यासाठी 724 कोटींचा निधी मंजुर.

Kharip-Pik-Vima

Kharip Pik Vima : या वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पीक विमा मिळेल अशी आशा होती.

    पण खूप दिवस उलटले तरी शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला नाही. अशातच आता एक खूप महत्त्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये खरीप पीक विमा 2022 (Crop Insurance 2022) साठी 724 कोटींपेक्षा जास्त निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

Kharip Pik Vima 2022

    राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे दि : 13 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) खरीप हंगाम सन 2022 करिता पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य शासनाचं हिस्सा रु. 724, 51,46,809/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा खूप महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे.

724 कोटींचा पीक विमा निधी कंपन्यांना मिळणार

    प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय दि.01/07/2022 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी (Insurance Company), आयसीआयसीआय लोंबार्ड (ICICI Lombard) जनरल इंशुरन्स कं.लि., बजाज अलियांझ (Bajaj Allianz) जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो (HDFC Ergo) जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया (United India) इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्याअंतर्गत राबविण्यात येत आहे. देशातील कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.

इथे पहा शासन निर्णय (GR)

Kharip Pik Vima

उर्वरित पीक विमा मिळण्याची शक्यता

    या आधी काही शेतकर्‍यांना खरीप हंगाम 2022 चा पीक विमा मिळाला आहे, परंतु अजूनही काही शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, ह्या शासन निर्णयामुळे उर्वरित शेतकर्‍यांना पीक विमा मिळू शकतो.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?