Silkworm Farming : रेशीम किटक संगोपनगृह कसे असावे ? जाणुन घ्या रेशीम शेती बदल माहिती. - Kisan Wani

Saturday, March 9, 2024

Silkworm Farming : रेशीम किटक संगोपनगृह कसे असावे ? जाणुन घ्या रेशीम शेती बदल माहिती.

रेशीम किटक संगोपनागृहात 22 ते 28  अंश सेल्सीअस तापमान व 80 ते 85 टक्के सापेक्ष आर्द्रता ठेवणे अतिशय महत्वाचे आहे.

Silkworm-Farming
Silkworm Farming

    रेशीम उदयोग (Silkworm Farming) हा मोठया प्रमाणाव रोजगार मिळवून देणारा उदयोग आहे. महाराष्ट्रतील रेशीम उत्पादक अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर आहे. आंध्रपदेश, कर्नाटक, तामिळनाडु , पश्चिम बंगाल या सर्व राज्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या उदयोगास असणा-या अनुकूल हवामानामुळे उदयेागाच्या प्रगतीला वाव असून मागील पाच वर्षात महाराष्ट्रत रेशीम किटक संगोपनामध्ये खुप मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे.


    रेशीम उदयोगासाठी पक्कया संगोपनागृहाची खुप आवश्यकता असते. मात्र देशातील ८० टक्के शेतकरी मात्र कच्च्या शेड नेट किंवा संगोपनगृहात रेशीम उद्योगासाठी उपयोग करतात.  कारण देशात अल्पभुधारक शेतकऱ्यांचे प्रमाण खुप जास्त आहे. या कारणामुळे पक्‍के किटकसंगोपन (Silkworm Farming) गृह बांधणीसाठी आर्थिक गुंतवणूक करणे त्यांना शक्य होत नाही.

Silkworm Farming

    रेशीम किटक संगोपनागृहात 22 ते 28 अंश सेल्सीअस इतक्या प्रमाणात तापमान व 80 ते 85 टक्के सापेक्ष प्रमाणत आर्द्रता ठेवणे अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्रात कच्‍च्‍या शेडनेट असल्यामुळे पावसाळा व हिवाळा या ऋतुतील 8 महिनेच हा उदयोग करणे शक्य आहे. कारण कच्च्या शेडमध्ये रेशीम किटक वाढीसाठी आवश्यक तितके तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रीत ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळेच रेशीम किटक (Silkworm Farming) तुती पाने खात नाहीत. त्याचा सर्व परिणाम किटकाच्या वाढीवर होऊन रेशीम कोष उत्पादनात अतीशय घट होते. तुती लागवड क्षेत्रानुसार किटक संगोपन गृहाचे बांधकाम होणे खुप आवश्यक आहे.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक एकर क्षेत्रावर तुती लागवड केली असेल तर किटक संगोपन (Silkworm Farming)  गृह आराखडा कसा असायला पाहिजे. 

    या विषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.

Silkworm Farming

जर एक एकर तुती लागवडीसाठी किटक संगोपनगृह आराखडा कसा पाहिजे.

  • तुती लागवड एकुण क्षेत्र :  1 एकर
  • कोषाचे पिक / वर्ष : 5 पीके
  • एका वेळी कमीत कमी  अंडीपुज घेण्याची क्षमता : 250 ते 300 रोगमुक्त अंडीपुंज
  • 100 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र : 700  ते 750 चौ.फुट
  • किटक संगोपन गृह आकार : 82 x 23 x 15 फुट
  • संगोपनगृह : 70 x 23 फुट
  • तुती फांदया साठवण गृह  : 12 x 13 फुट
  • बाल्य किटक संगोपनगृह  : 12 x 10 फुट
  • 1 रॅकसाठी लागणारे चटई क्षेत्र  : 30 x 5  = 130 चौ फुट
  • 4 ताळी एका रॅकचे चटई क्षेत्र  : 150 x 4 = 600 चौ.फुट
  • 4 ताळी दोन रॅकचे चटई क्षेत्र  : 600 चौ. फुट x 4= 2400 चौ.फुट

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?