Senior Citizens FD Rates : ज्येष्ठ नागरिकांना या ५ बँकेमध्ये एफडीवर ८. १% पर्यंत व्याजदर मिळणारं.. - Kisan Wani

Tuesday, January 30, 2024

Senior Citizens FD Rates : ज्येष्ठ नागरिकांना या ५ बँकेमध्ये एफडीवर ८. १% पर्यंत व्याजदर मिळणारं..

Senior Citizens FD Rates
Senior Citizens FD Rates
Senior Citizens FD Rates : वृद्धावस्थेत, मुदत ठेव (Fixed Deposit) वरून मिळणारे व्याज हे ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे उत्पन्न असते. अशा ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (Fixed Deposit) वर जितके जास्त व्याज मिळते तितकाच त्यांना फायदा होतो.

    सध्या, देशातील खाजगी क्षेत्रातील अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर चांगलं व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेव (Fixed Deposit) वर ८.१ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या एफडीवर दिला जात नाही. देशातील कोणत्या खाजगी बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेव वर ८.१ टक्के व्याज दिले जातो याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. 

Senior Citizens FD Rates

DCB Bank FD Rates

    1. DCB बँक ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव वर ८.१ टक्के पर्यंत व्याजदर दिला जात आहे. हे व्याज 26 महिने ते 37 महिन्यांच्या मुदतीच्या मुदत ठेवीवर  (Fixed Deposit) दिले जात आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, या मुदत ठेव  (Fixed Deposit) मधील तुमचे पैसे 8.8 वर्षांत दुप्पट होतील.

    RBL Bank FD Rates

    1. RBL बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (Fixed Deposit) वर ८ टक्के पर्यंत व्याजदर दिला जात आहे. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना २ वर्ष ते ३ वर्षाच्या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर दिले जात आहे. RBL बँकेत तुमची मुदत ठेव (Fixed Deposit) रक्कम दुप्पट होण्यासाठी 9 वर्षे लागतील.

    IndusInd Bank FD Rates

    1. इंडसइंड बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेव (Fixed Deposit) वर ८ टक्के पर्यंत व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर २१ महिने ते ३९ महिन्यांच्या कालावधीसाठी मुदत ठेव वर दिला जात आहे. अशा प्रकारे, जर तुम्ही इंडसइंड बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकाची मुदत ठेव केली तर तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.

    IDFC Bank FD Rates

    1. IDFC बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव (Fixed Deposit) वर 7.75 टक्के पर्यंत व्याजदर दिला जात आहे. ही ऑफर १२ महिने 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेव वर दिली जात आहे. जर तुम्ही IDFC बँकेमध्ये मध्ये पैसे गुंतवले तर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 9.2 वर्षे लागतील.

    ICICI Bank FD Rates

    1. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ICICI बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची मुदत ठेव (Fixed Deposit) देखील करू शकता. येथे तुम्हाला ७.५ टक्के पर्यंत व्याजदर दिला जात आहे. हा दर १२ महिने 1 दिवस ते 3 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या मुदत ठेव (FD) वर दिला जात आहे. या मुदत ठेव मधील तुमचे पैसे 9.6 वर्षात दुप्पट होतील.

    No comments:

    Post a Comment

    मी आपली काय मदत करू शकतो ?