Tur Market Rate : शेतकऱ्यांनी तुरी विकल्यावर भाव चढला. - Kisan Wani

Friday, March 3, 2023

Tur Market Rate : शेतकऱ्यांनी तुरी विकल्यावर भाव चढला.

Tur-Market-Rate
Tur Market Rate

Tur Market Rate : तुरीला सध्या मिळतोय पांढऱ्या सोन्याचा (कापूस) भाव. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, मात्र आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांनी आपली तूर विकून टाकली आहे. या दरवाढीचा फायदा फक्त 10 टक्केच शेतकऱ्यांना  मिळणार आहे. 


    ज्यांनी दरवाढीच्या अंदाजाने तूर (Tur Bajar Bhav) घरातच ठेवली होती. कापसाला देखील सध्या 7 हजार 500 ते 8 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी तूर ठेवली होती त्यांनी आता तूर विक्रीला काढली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी तूर विकून टाकली आहे. तुरीबरोबर डाळीचे भावही कडाडले.  यामुळे वार्षिक डाळ (Tur Dal Rate) खरेदी करणाऱ्यांना खिसा सैल ठेवावा लागणार आहे.


Tur Market Rate

आठवड्यात काय मिळाला भाव ?

    वार प्रति क्विंटल भाव
    सोमवार : 5500 - 7000
    मंगळवार : 6500 - 7550
    बुधवार : 4500 - 7600
    गुरुवार : 5300 - 7000
    शुक्रवार : 7000 - 7800

कोणत्या बाजार समितीत काय भाव ?

    बाजार समिती    भाव
    अहमदनगर      :   7600
    कर्जत                 7500
    शेवगाव            :   7800
    श्रीगोंदा             :   7500
    कोपरगाव           7000
    जामखेड           :   7500

आणखी भाव वाढतील का ?

    गेल्या आठवड्यात तुरीच्या दरात क्विंटलमागे 650 ते 2 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 7 हजार 500 ते 8 हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव जाऊन मिळतं. तुरीची आयात झाली नाही आणि शेतकऱ्यांकडील आवक वाढली नाही तर तुरीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?