PM Kisan Installment : पीएम किसानच हप्तात खरंच वाढणार का ? - Kisan Wani

Thursday, January 12, 2023

PM Kisan Installment : पीएम किसानच हप्तात खरंच वाढणार का ?

PM-Kisan-Installment
PM Kisan Installment 

PM Kisan Installment : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 13  व्या हप्त्याची वाट देशातील सर्व शेतकरी पाहत आहेत. जानेवारी महिन्यांमध्ये पीएम किसानचा 13  व्या हप्ता जमा होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

    केंद्र शासनाच्या  2023  च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान  योजनेच्या हप्त्याची (Pm Kisan Scheme) रक्कम वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. 

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार 2023 मध्ये किसान सन्मान योजनेत 2 हजारांची भर घालण्यात येणारं आहे. यावर अजून कोणतीही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही.

PM Kisan Installment

    1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसानचा निधी वाढवण्याची तरतूद करण्यात येईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

    पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याची वाट देशातील सर्व शेतकरी पाहत आहेत. जानेवारी महिन्यांमध्ये पीएम किसानचा 13 व्यां हप्ता जमा होण्याची शक्यताही वर्तविण्यात येतं आहे. 

    2018 पासून सुरू झालेल्या पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासन दरवर्षी ६ हजार रुपये जमा करते. ही रक्कम तीन टप्प्याच्या अंतराने केंद्र शासन २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. 

PM Kisan Installment

    ऑक्टोबर 2022  मध्ये या योजनेचा 12  व्या हप्ता जमा करण्यात आला होता. जानेवारी 2023 च्या पहिल्या 13 वा हप्ता जमा होईल, अशी ही चर्चा साध्या सुरू आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?