Saur Krishi Vahini Yojana : काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना ? - Kisan Wani

Saturday, March 4, 2023

Saur Krishi Vahini Yojana : काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना ?

Saur-Krishi-Vahini-Yojana
Saur Krishi Vahini Yojana

Saur Krishi Vahini Yojana : शेतकऱ्यांना 24 तास : वीजपुरवठा करण्यात यावा. यासाठी केंद्रासह राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेत आहेत. त्यासाठी सौर ऊर्जेचा (Solar energy) पुरेपूर वापर करून ऊर्जा निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. 

    त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना 2017 पासून अमलात आणली आणि त्यासाठी लागणारी जमीन (Land) सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं आहे.

Saur Krishi Vahini Yojana

काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना ?

    महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने ही योजना (MSKVY) सुरु केली.  या योजनेअंतर्गंत शासन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करणार आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सोलर पॅनल (MSKVY Solar) बसवून वीज निर्मिती केला जाणार आहे. या योजनेंतर्गत, सुमारे 1 ते 10 मेगावॅट क्षमतेचे  सोलर पॅनल उभारण्यात येणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे
  • शेतीचा सातबारा
  • जमिनीचा नकाशा
  • ओळखपत्राची प्रत
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • लागवडीयोग्य जमिनीची कागदपत्रे
  • सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जागा शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र

लाभ घेण्यासाठी काय कराल ?

  • लाभार्थी मूळचा महाराष्ट्राचा असावा.
  • शेतकऱ्याला स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे, ज्यावर तो शेती करू शकतो.
  • या जमिनीची सर्व कागदपत्रे शेतकऱ्याकडे असावीत.
  • शेतकऱ्याला जमीन (Land)  मिळत असेल तर त्यावर व्याज द्यावे लागेल.
  • या योजनेत शेतकरी, शेतकरी बचत गट इत्यादींना सहभागी करून घेता येईल.

वर्षाला एकरी ३० हजार रुपये भाडे

     शेतकऱ्यांची अतिरिक्त जमीन महावितरणला भाडेपट्ट्याने देणे. यानुसार सरकारी जमिनीचा भाडेपट्टी दर ठरविण्यात येईल. तो प्रत्येक शेतकऱ्याला देणे आवश्यक असेल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY) महाराष्ट्र अंतर्गत 30 वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टा दर एक रुपया असेल.

    सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी जमीन प्रति एकर 30 हजार रुपये आणि वार्षिक 3 टक्के वाढीसह असेल. इच्छुक लाभार्थी लवकर या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे अर्ज करू शकतात.

किमान तीन एकरापासून ५० एकरापर्यंत

    या योजनेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी 3 एकरापासून तर जास्तीत जास्त ५० एकरापर्यंतची जमीन करार पद्धतीने देता येऊ शकते.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?