Kusum Solar Yojana : वीज असो नसो, शेतीला मिळणार पाणी. - Kisan Wani

Thursday, March 2, 2023

Kusum Solar Yojana : वीज असो नसो, शेतीला मिळणार पाणी.

Kusum-Solar-Yojana
Kusum Solar Yojana
Kusum Solar Yojana : देशभरात प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा महाअभियान अर्थात "कुसुम योजना" राबविल्या जात आहेत. या अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून एक लाख विहिरींना सौरऊर्जेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. या योजनेअंतर्गत एक लाख सौरऊर्जा कृषिपंप शेतकऱ्यानं मिळणार आहे. 

    यात 30 टक्के वाटा केंद्र सरकार देणार आहे. पाच ते दहा टक्के वाटा शेतकऱ्यानं भरायचा आहे. इतर निधी राज्य सरकार देणार आहे. या योजनेत एससी, एसटी यांना 95 टक्के अनुदान असणार आहे. शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान राहणार आहे. ज्या ठिकाणी वीजवाहिनी पोहोचली नाही अशाच ठिकाणी 'कुसुम'मधून सौरऊर्जा कृषिपंप जोडण्याच्या सूचना आहेत.

Kusum Solar Yojana

कोणाला लाभ घेता येतो ?

    अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर सर्व घटकांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.

काय आहे पीएम कुसुम योजना ?

    या योजनेमध्ये ज्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या तारा पोचल्या नाहीत, अशा ठिकाणी सौर कृषिपंपाच्या माध्यमातून सिंचन करता येणार आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार किती अश्वशक्तीचा सौर कृषिपंप लागेल याची निश्चिती केली जाईल. 

    ज्या ठिकाणी वीज जोडणी झाली नाही अशा ठिकाणी सौर कृषिपंप दिले जाणार आहेत. यासाठी संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?