![]() |
Tur Rate |
Tur Rate : तुरीला सध्या पांढऱ्या सोन्याचा (कापूस) भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, आतापर्यंत 90 टक्के शेतकऱ्यांनी तूर विकून टाकली आहे. या भाववाढीचा फायदा फक्त टक्केच शेतकऱ्यांना 10 मिळणार आहे.
ज्यांनी भाववाढीच्या अंदाजाने तूर घरातच ठेवली होती. कापसालाही सध्या 7500 ते 8 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर विक्रीला काढली आहे. तुरीपाठोपाठ डाळीचे भावही कडाडले. यामुळे वार्षिक डाळ खरेदी करणाऱ्यांना खिसा सैल ठेवावा लागणार आहे.
Tur Rate
आम्ही मागील महिन्यातच विकली तूर
भाव वाढणार नाही असे वाटल्याने आम्ही फेब्रुवारी महिन्यात 7 हजार रुपये क्विंटलने तूर विक्री केली. आता त्यात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली. आता मोठ्या शेतकन्यांकडेच तूर शिल्लक आहे. भाववाढीमुळे शेतकऱ्यांपेक्षा साठेबाजी करणाऱ्या मोठ्या कंपन्यांना नफा होईल.
आणखी भाव वाढतील
मागील आठवड्यात तुरीच्या दरात विचटलमागे 650 ते 2000 रुपयांपर्यंत वाढ झाली. शनिवारी 7500 ते 8050 रुपये विचटलपर्यंत भाव जाऊन पोहोचला. तुरीची आयात झाली नाही व शेतकऱ्यांकडील आवक वाढली नाही तर तुरीच्या भावात आणखी वाढ होईल.
Tur Rate
रोगामुळे उत्पादन घटले
- मागील वर्षी तुरीवर मातीतील बुरशीजन्य आजार वाढला होता.
- तूर फुलांच्या अवस्थेत असताना धुके पडले, त्यामुळे फुलगळ झाली होती.
- जिथे शेंगा आल्या, त्या भरल्या नाहीत. त्यामुळे 25 ते 30 टक्क्यांपर्यंत घट झाली होती.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?