Vihir Anudan Yojana : शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रु अनुदान. - Kisan Wani

Friday, January 13, 2023

Vihir Anudan Yojana : शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रु अनुदान.

Vihir-Anudan-Yojana

Vihir Anudan Yojana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या अंतर्गत सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान मिळणारं आहे. त्यानुसार, राज्यात अजून 3 लाख 87 हजार 500 विहिरी खोदणं शक्य असल्याचं भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेनं सांगितलं आहे.

    विहिरीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर यांची पात्रता काय आहे ? यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ? या बदलाची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Vihir Anudan Yojana

लाभधारकाची पात्रता

  • अर्जदाराकडे कमीत कमी 1 एकर शेतजमीन असावी.
  • अर्जदाराच्या सातबाऱ्यावर या आधीच विहिरीची नोंद असू नये.
  • एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा.
  • अर्जदार हा जॉब कार्डधारक असणे आवश्यक आहे.

लाभधारकाची निवड कशी होते ?

    या योजनेत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, शासन निर्णयानुसार.
  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • विमुक्त जाती
  • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
  • विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)

आर्थिक मदत किती ?

    महाराष्ट्र हे मोठं राज्य असून प्रत्येक भागाची स्थानिक व भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे राज्यासाठी विहिरीचा एकच आकार आणि दर निश्चित करणं शक्य नाही. त्यामुळे मग विहिरीच्या कामासंबंधी आर्थिक व तांत्रिक बाबी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येईल.

    त्यानुसार, प्रत्येक जिल्ह्यानं विहिरीसाठी 4 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. असं शासनाने स्पष्ट केलं आहे.

Vihir Anudan Yojana

आवश्यक  कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8-अ चा उतारा
  • मनरेगा जॉब कार्ड

अर्ज कुठे व कसा करायचा ?

    मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी सध्या तरी ग्रामपंचायतीकडे अर्ज करता येईल. हा अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम ग्रामपंचायत करेल. शेतकऱ्यानं ग्रामपंचायत कडून पोच पावती घ्यावी. ऑनलाईन पध्दतीने अर्ज सुरू झाल्यानंतर शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

    अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विहिरीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण परिस्थितीत विहीर पूर्ण करण्याचा कालावधी 2 वर्षांचा आहे. अपवादात्मक परिस्थिती (दुष्काळ, पूर, इ.) विहीर पूर्ण करण्याचा कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षां पर्यंत राहिल.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?