Super El Nino 2024 : सुपर एल निनो काय आहे ? २०२४ मध्ये देशात दुष्काळ पडणारा का ? - Kisan Wani

Sunday, December 31, 2023

Super El Nino 2024 : सुपर एल निनो काय आहे ? २०२४ मध्ये देशात दुष्काळ पडणारा का ?

Super el nino
 Super el nino

    Super el nino  : अमेरिकेच्या नोआ (National Oceanic and Atmospheric Administration) या हवामान संस्थेनं याबाबतचा अंदाज काही दिवसांपूर्वी दिला होतो. या बातमीत आपण सुपर एल निनो (el nino) म्हणजे काय, त्याचा आपल्या देशातील पावसावर काय परिणाम होऊ शकतो, या बदलाची सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

Super el nino सुपर एल निनो म्हणजे काय ?

    सुपर एल निनो म्हणजे काय, हे पहाण्या अगोदर एल-निनो म्हणजे काय हे जाणून घेऊ. एल-निनो ही प्रशांत महासागरात निर्माण होणारी एक वातावरणीय स्थिती आहे. प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान हे नेहमीपेक्षा खूप जास्त होते, तेव्हा त्या बदललं ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. 

    प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान कमीत कमी 26 ते 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहतं. त्यात समुद्राच्या पाण्याच्या तापमानात काही वाढ होऊन ते 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, या हवामान बदलला सुपर एल निनो म्हणतात.

Super El Nino 2024 

    मार्च आणि  मे या महिन्यात उन्हाळ्याचा कालावधी असतो. नेमका याच कालावधीत एल निनो आतापर्यंतच्या सर्वाधिक तीव्र स्थितीत होण्याची शक्यता आहे. नोआ या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, मार्च आणि मे 2024 या महिन्यात सुपर एल निनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. तीव्र ‘एल-निनो’ स्थितीची शक्यता 70 ते 75 टाक्यापर्यंत असू शकते.

    जागतिक तपमानात देखील 2 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता 30 टक्क्यांहून अधिक आहे. 1972–73, 1982–83, 1997–98 आणि 2015–16 या वर्षांमध्ये अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली होतो. यामुळे अनेक देशांना तीव्र तापमान आणि  दुष्काळाचं सामना करावा लागला. 2024 मध्ये देखील हीच स्थिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Super El Nino

    प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर असल्याने, वाऱ्यांची ताकद, दिशा आणि तापमानातील बदल यांचा परिणाम जागतिक हवामान बदलास कारणीभूत ठरतात. भारतात जेव्हा जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा बहुतेक वेळा वातावरणात अल निनो सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. या वर्षी आपल्याकडे दुष्काळ असून वातावरणात अल निनो सक्रिय आहे.

  1.  सुपर एल निनोमुळे उत्तर अमेरिकन काही देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमाना, बरोबर दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सुपर एल निनोचा आपल्या देशातील पावसावर परिणाम होऊ शकतो का ?

    ज्येष्ठ कृषी व हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणतात, भविष्यात मोठा दुष्काळ पडण्याची जी भीती निर्माण केली जात आहे ती योग्य नाही. कारण दुष्काळासाठी एल निनो हा एकमेव घटक जबाबदार नाही. तर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे हवामान बदल देखील महत्वाचे आहे.

    हवामानातील बदल म्हणजे हवेतील कार्बन डायऑक्साइड आणि इतर मिथेन, नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण वाढणे. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे तेथील हवेचा दाब कमी होतो, त्यानंतर येथील वारे कमी दाबाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी जातात, त्यामुळे अतिवृष्टी आणि दुष्काळ पडतो. ही परिस्थिती हवामान बदलामुळे आहे. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?