Land NA Process : NA प्रक्रियेत मोठी सुधारणा, बघा काय बदलणार - Kisan Wani

Sunday, June 18, 2023

Land NA Process : NA प्रक्रियेत मोठी सुधारणा, बघा काय बदलणार

Maharashtra-Land-NA-Process
Maharashtra Land NA Process

Land NA Process : जमिनीच्या एनए करण्यासाठीच्या प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारने काही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने 23 मे 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता.  


    त्यानुसार आता बांधकाम परवानगी मिळालेल्या भूखंडावर स्वतंत्ररित्या एनए करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. सरकारचा निर्णय नेमका काय आहे ? या निर्णयामुळे सध्या सुरु असलेल्या प्रक्रियेत काय फरक पडणारं आहे. मुळात एनए म्हणजे काय आणि एनए च्या प्रक्रियेत याआधी नेमकी कोणते बदल झाले, कोणत्या सुधारणा झाल्या आहेत. या बद्दलची सविस्तर माहिती जाणुन घेऊयात..


Land NA Processaa

    सर्व साधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो पण जर का तुम्हाला जमिनीचा वापर हा बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक, वाणिज्य किंवा रहिवासाठी करायचा असेल तर त्यासाठी तुमहाला कायदेशीर परवानगी घ्यावी लागते म्हणजेच शेतीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याची जी कायदेशीर परवानगी प्रक्रिया आहे. त्यालाच जमिनीचा एनए किंवा नॉन अग्रिकल्चर (Non Agricultural Land) असे म्हणतात.

नवीन सुधारणा काय ?

  • महसूल विभागाच्या नवीन निर्णयानुसारजर का एखाद्या प्लॉटवर किंवा भूखंडावर बांधकामाची परवानगी आधीच मिळाली असेल तर त्या प्लॉटच्या एनए (NA) करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता नसणार आहे.

Land NA Process

एनए प्रक्रियेत या आधी झालेल्या सुधारणा
    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (अ) (ब) (क) (ड) यानुसार जमीन एनए (Land NA) करण्यासाठी किंवा जमिनीच्या आकर्षक वापरासाठी परवानगी देण्यात येत होती. कालांतराने या कायद्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांमुळे जमिनीच्या एनए (Land NA) परवानगीच्या कार्यपद्धतीत बदल झाला याबाबतचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागात 13 एप्रिल 2022 रोजी जाहीर केला होता. त्यात काय नेमणूक केले ते आता पाहूयात.

  1. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 42 (ब) या नवीन सुधारणेनुसार,  जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रामध्ये अंतिम विकास आराखडा तयार केला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेण्याची गरज असणार नाही.
  2. कलम 42 (क) या सुधारणेनुसार, तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना (Regional Planning) तयार करण्यात आली असेल आणि ती मान्य करण्यात आली असेल तर या क्षेत्रातील जमिनींचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ शकेल.
  3. कोणत्याही गावाच्या हद्दीपासून ज्यांची जमीन किमान 200 मीटरच्या आत आहे, अशा शेतमालकांना एनए परवानगीची गरज असणार नाही, अशी सुधारणा कलम 42 (ड) मध्ये करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?