Onion Market Rate : कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. - Kisan Wani

Wednesday, March 1, 2023

Onion Market Rate : कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू.

Onion-Market-Rate
Onion Market Rate

Onion Market Rate : राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये 6 ते 12 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहेत. अनेक किमान दर 1 ते 5 रुपये झाला असून, उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 1416 टन कांद्याची आवक झाली आहे. 


    आवक वाढत असल्यामुळे दर घसरू लागले आहेत. प्रतिकिलो सहा रुपयांपासून कांद्याची खरेदी सुरू झाली. खूपच चांगल्या कांद्याला 12 रूपये दर मिळत होते. कांद्याचे उत्पादन व पुणे,नाशिक परिसरातून मुंबईपर्यंतच्या वाहतुकीचा खर्चही नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोलापूर, सिन्नर, राहुरी, चांदवड, मनमाड, सटाणा बाजार समितीमध्ये प्रतिकिलो 1 रुपयांपासून कांद्याची खरेदी सुरू झाली. बाजार समितीपर्यंतच्या वाहतुकीचा खर्चही शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे.


Onion Market Rate 

बाजार समितीमधील कांद्याचे दर
  • मुंबई : 6 ते 12 
  • कोल्हापूर : 4 ते 13 
  • सातारा : 2 ते 10 
  • लासलगाव : 2 ते 8
  • औरंगाबाद : 1 ते 5 
  • येवला : 2 ते 7 
  • नागपूर : 6 ते 10 
  • चांदवड : 1 ते 7  
  • मनपा : 1 ते 7 
  • अहमदनगर : 5 ते 10 
  • सोलापूर : 1 ते 17 
    राज्यातील सर्व बाजार समितीत प्रतिदिन बाजारभाव कमी होत आहेत. यामुळे कांदा विकायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?