Kanda Anudan 2023 : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याला प्रतिक्विटल 300 रुपये अनुदान. - Kisan Wani

Tuesday, March 14, 2023

Kanda Anudan 2023 : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, कांद्याला प्रतिक्विटल 300 रुपये अनुदान.

Kanda-Anudan-2023
Kanda Anudan 2023

Kanda Anudan 2023 : संकटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याला प्रति क्विंटल 300 रुपये अनुदान देण्याची घोषणा सोमवारी विधानसभेत करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या (Onion Anudan) घोषणेवर नाराजी व्यक्त करीत विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. 


    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे सांगितले की, खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक खूप  मोठ्या प्रमाणावर आहे. देशातील इतर राज्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणत वाढल्याने पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याच्या दरामध्ये "Onion Rate" घसरण झाली आहे.

Kanda Anudan 2023

समितीची २०० रुपये शिफारस होती
    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली होती. समितीने 200 आणि 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकयांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिक्विटल 300 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?