Anandacha Shidha : 1.63 कोटी रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा. - Kisan Wani

Monday, February 27, 2023

Anandacha Shidha : 1.63 कोटी रेशन कार्ड धारकांना मिळणार आनंदाचा शिधा.

Anandacha-Shidha
Anandacha Shidha
Anandacha Shidha : गुढीपाडवा तसेच डॉबाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील 1 कोटी 63 लाख रेशन कार्ड धारकांना होणार आहे. या आगोदर दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. 

    औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्यरेषेवरील रेशन कार्ड धारकांना 1 किलो चणाडाळ, 1 लिटर पामतेल, 1 किलो रवा आणि 1 किलो साखर असा आनंदाचा शिधा गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिन्यासाठी ई-पॉसद्धारे प्रतिसंच 100 रुपये दराने हा शिधा दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने हा शिधा वाटप केला जाईल.

Anandacha Shidha

    हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाइन पोर्टलद्वारे २१ दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 
कोणाला मिळणार आनंदाचा शिधा ?

    गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील रेशन कार्ड धारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा मिळणार आहे. हा लाभ अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कार्डधारक असणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. त्यानुसार प्राधान्य गटात 4 लाख 77 हजार 998 तर अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 1 लाख 37 हजार 115 जणांना या शिधाचा लाभ घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?