Tractor Anudan Yojana : या आधुनिक काळात दिवसेंदिवस कृषी क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होत आहे. त्यातच सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजना (Tractor Subsidy Scheme) ही अतिशय महत्त्वाची योजना आहे.
या योजनेसाठी 56 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर त्याबद्दलचा शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे, त्या शासन निर्णयाची थोडक्यात माहिती आपण या लेखात पाहूया.
Tractor Anudan Yojana Maharashtra 2023
कृषि विभागाअंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची त्या बरोबर, बाहय सहाय्यित प्रकल्पांची अमंलबजावणी केली जाते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे तयार झाल्यानंतर शासनास वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यांत निधी प्राप्त होतो. तसेच, राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील टप्प्या-टप्प्याने निधी प्राप्त होतो.
Tractor Anudan Yojana
शासन निर्णय
त्यानुसार अर्थसंकल्पिय तरतूदीच्या 60% च्या मर्यादेत रु.240 कोटी निधीच्या कार्यक्रमास सरकार निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता मिळाली असून रु. 140 कोटी रु. इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता 56 कोटी इतका निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या बदल दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?