Sukanya Samriddhi Yojana : लेकीच्या भविष्यासाठी 'सुकन्या' काढले का ? - Kisan Wani

Friday, February 24, 2023

Sukanya Samriddhi Yojana : लेकीच्या भविष्यासाठी 'सुकन्या' काढले का ?

Sukanya-Samriddhi-Yojana
Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : भारत सरकारच्या भारतीय डाक विभागातर्फे सुकन्या समृद्धी योजनेत 10 वर्षाखालील मुलींच्या नावाने त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची सुवर्णसंधी धावून आली असून, सुकन्या समृद्धी योजनेचे हे प्रमुख खाते मुलीच्या जन्मापासून वयवर्षे 10 पर्यंत मुलीच्या नावाने पालकांद्वारे उघडता येते. 


    स्वतंत्र पासबुकची सुविधा उपलब्ध असून, ही योजना मुलीच्या भविष्यासाठी लाभदायक असल्याने लेकीच्या भविष्यासाठी 'सुकन्या' काढाच, असे आवाहन डाक विभागाने केले आहे. किमान 250 रुपये आणि कमाल 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम एका आर्थिक वर्षात गुंतवता येते. 


    एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात रक्कम भरणा संख्येवर मर्यादा नाही. तसेच एका कुटुंबातील किमान दोन मुलींसाठी सुकन्या खाते उघडता येते. जुळ्या, तिळ्या मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात.


Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या योजना कागदपत्रे

  • सुकन्या समृद्धी योजना (प्रपत्र) फॉर्म
  • मुलीचा जन्म दाखला
  • पॅनकार्ड
  • आधारकार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • रेशनकार्ड, वीज बिल
  • (कागदपत्रे पालकांची असावीत.)

सुकन्या खाते 

  • खाते उघडल्यानंतर 50 रुपयांच्या पटीत पैसे भारता येतात.
  • दरवर्षी ३१ मार्चला आकर्षक व्याज जमा होते.
  • कलम ८० सी अंतर्गत आयकरात सूट. 
  • खाते उघडल्यापासून १५ वर्षे पैसे भरता येतात.
  • मुलीच्या लग्नासाठी संपुर्ण रक्कम काढण्याची सुविधा किंवा खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी हे खाते बंद करता येते.
  • कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये आणि ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र व आई- वडील किंवा वडील असे दोघांपैकी एकाचे KYC कागदपत्रे लागतात.
  • लेकीच्या भविष्यासाठी 'सुकन्या' काढले का ?

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?